Saturday, 16 March 2019

जाहिरातीचा परिणाम

नमस्कार आज पहिल्यांदाच लिहिते आहे तसे कॉलेज जीवना पासून लिहिले आहे अनेकदा पण सोशल मिडीयाच्या माध्यमातून पहिल्यांदाच असो तर आता आपण भेटत राहू आजच एक लेख वाचाल जाहिरातीत आई अनेकदा दिसते. खरे तर जाहिरात हि एखाद्या कंपनीची स्वतःची असते आपलेच उत्पादन अनेकान पर्यंत पोचविण्यासाठी पण खरच या जाहिराती सुद्धा समाज मनावर परिणाम करतात. मग जर चांगल्या असतील तर त्यांची प्रशंसा केली जाते पण जर समाज स्वास्थ्य बिघडवणाऱ्या असतील तर त्यावर वादंग होते. जसे मिडीयाने समाज हित बघितले पाहिजे तसेच या जाहिरात बनवणाऱ्यानी पण लक्षात ठेवायला हवे आहे.
         आता हेच बघाना पूर्वी पार्ले बिस्किटाची जाहिरात होती नातू आजीसाठी बिस्कीट चोरून आणतो. पण ग्राहक पंचायत या संघटनेला त्याचा विरोध करावा लागला आणि जाहिरात बंद करावी लागली. आता अशी एक जाहिरात आली आहे होळीच्या निमित्ताने सर्फ xl ची बघितले गेले तर साधी आहे पण त्यात लव जिहाद ला प्रोत्साहन देण्यात आले आहे अरे जाहिरातच करायची असेलतर बघा पूर्वी होती लहान मुलगी आहे तिचे डोळे,हात,पाय बांधलेले आहेत आणि तिचे बाबा येतात व हळूहळू ते तिला बंधमुक्त करतात. दुसरे अलीकडील एक आई मुलाच्या लग्नाचे कपडे खरेदी करते व गाडीतून परत येताना त्याला सांगते कि माझ्याच घराजवळ पण दुसरे घर घे. यात येणाऱ्या मुलीचीही हौस व आपल्या जवळहि राहिला असे दोन्हीही साध्य होते. पण मुद्दाम हिंदुमुस्लीम वाद वाढणाऱ्या जाहिराती का आता बघाना जाहिरातीने खरेतर सर्फ ला फायदा व्हावा पण अनेक लाखांचा फटका बसलाना . मला बाबा असे वाटले बघा तुमचे मत काय आहे. 

No comments:

Post a Comment